आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग:65 वर्षीय वृद्धाला तीन वर्षांचा कारावास; जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

अमरावती6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिकवणी वरून घरी जात असलेल्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला पेढा देण्याच्या बहाण्याने एका 65 वर्षीय वृद्धाने मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी जिल्हा सत्र (क्रमांक 5) न्यायाधीश पी. एन. राव यांच्या न्यायालयाने वृध्दाला शनिवारी तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.

काय आहे घटना?

यशवंत गंगारामजी तायडे (65, रा. तपोवन परिसर, अमरावती) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. 19 ऑक्टोबर 2016 ला सांयकाळी सात वाजताच्या सुमारास पीडित मुलगी ही शिकवणी वर्गावरुन घरी परत जात होती. त्याचवेळी यशवंत तायडे तीला रस्त्यात भेटला. त्यावेळी तायडेने मुलीला पेढा देण्याच्या बहाण्याने घरी बोलवले. तायडे परिचित असल्यामुळे मुलगी त्याच्या घरात गेली. त्यावेळी तायडेने आक्षेपार्ह पध्दतीने स्पर्श करुन मुलीचा विनयभंग केला. त्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसात तक्रार देण्यात आली.

गुन्हा दाखल

तक्रारीवरुन पोलिसांनी यशवंत तायडेविरुध्द विनयभंग तसेच पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. प्रकरणाचा तपास पुर्ण झाल्यानंतर गाडगेनगर पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान शासकिय अभियोक्ता अ‍ॅड. पी. आर. इंगळे यांनी एकूण आठ साक्षिदारांच्या साक्ष तपासल्या. न्यायालयात तायडे विरुध्द गुन्हा सिध्द झाल्यामुळे न्यायालयाने तीन वर्ष सश्रम कारावास तसेच 5 हजारांचा दंड, दंड न भरल्यास दोन महिने अतिरीक्त कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. तसेच दंडाची संपुर्ण रक्कम ही पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...