आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्वपरीक्षा:जिल्ह्यात 6,577 उमेदवार देणार एमपीएससीची पूर्वपरीक्षा

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा १७ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. शहरातील २३ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ६ हजार ५७७ उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. परीक्षा केंद्रांवर ७४० अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ घेण्यात येणार आहे. ही परीक्षा १७ डिसेंबर २०२२ रोजी होणार आहे.

वनक्षेत्रपाल, गट-ब या पदासाठी १३ जागा, उप संचालक, कृषी व इतर गट- अ या पदासाठी ४९ जागा, तालुका कृषि अधिकारी व इतर, गट-अ या पदासाठी १०० जागा, कृषि अधिकारी, कनिष्ठ व इतर, गट-ब या पदासाठी ६५ जागा, सहायक अभियंता, स्थापत्य, गट ब श्रेणी - २ या पदासाठी १०२ जागा, सहायक अभियंता, विद्युत व यांत्रिकी, गट ब, श्रेणी-२ या पदासाठी ४९ जागा अशा एकूण ३७८ जागांवर नोकरीची संधी उमेदवारांसाठी आहे. शहरातील २३ विविध केंद्रांवर होणाऱ्या परीक्षेकरिता ६ हजार ५७७ उमेदवार पात्र ठरले आहेत. १७ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते १२ या वेळात ही परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने ७५० अधिकारी कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...