आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाइन फ्लूचा शिरकाव:जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे सक्रिय ७ रुग्ण; एका रुग्णाचा मृत्यू, ११ जणांच्या तपासणी अहवालाची प्रतीक्षा

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा शिरकाव झाला असून, ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत ८ संशयित रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामधील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर ११ संशयित रुग्णांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने दिली. स्वाइन फ्लूचा शिरकाव होताच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली असून, नागरिकांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात सध्या पावसाळ्यामुळे सर्दी, खोकल्याच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच साथ रोगाचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अशातच आता जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे ही डोके वर काढले आहे. १ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे ८ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये एकाचा स्वाइन फ्लूचे मृत्यू झाला आहे. तसेच इर्विन येथे कार्यरत एका डॉक्टरला ही स्वाइन फ्लूची लागण झाली होती. जिल्हा रुग्णालयातून पाठवण्यात आलेल्या स्वाइन फ्लूच्या ११ संशयित रुग्णांचा अहवाल अजून अप्राप्त असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली राज्याच्या आरोग्य यंत्रणेने सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला.

बातम्या आणखी आहेत...