आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 सरपंच, 135 सदस्यांसाठी निवडणूक:नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील 7 ग्रामपंचायतवर येणार महिलांची सत्ता

अमरावती9 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी असलेल्या सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील कोदोरी, माऊली चोर, चिखली वैद्य, सावनेर, शेलुगुंड, येवती, लोहगाव या ग्रामपंचायतींमध्ये महिलांसाठी सरपंच पद आरक्षित असल्याने येथे महिला राज येणार असून तालुक्यात 17 सरपंच, तर 135 ग्रामपंचायत सदस्यासाठी निवडणूक होणार आहे.

तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंच पदासाठी निवडणुकीकरिता तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध केली आहे. होवू घातलेल्या या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येतील.

5 डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत असून त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 18 डिसेंबर रोजी, तर मतमोजणी दोन दिवसांनी म्हणजेच 20 डिसेंबर रोजी होईल. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सर्वत्र ग्रामपंचयतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा रंगताना दिसत आहेत. इच्छुकही तयारीला लागल आहेत.

थंडीच्या गारव्यात राजकारण तापणार

या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून लक्ष देत असल्याने थंडीच्या गारव्यात ग्रामपंचायत निवडणूक चांगलीच तापताना दिसत आहे. निवडणुकीच्या अनुषंगान तालुक्यातील पुढाऱ्यांनीदेखील मोर्चे बांधणीकडे लक्ष केंद्रित केले आहे. तालुक्यात निवडणुकीच्या चर्चांना उधाण येत आहे. थंडीतही निवडणुकीचे राजकारण तापत असल्याचे चित्र सध्या तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींनमध्ये दिसत आहे.

गावनिहाय सरपंच पदाचे आरक्षण

 • कोदोरी - सर्वसाधारण स्त्री
 • खिरासाना - सर्वसाधारण
 • माऊली चोर - नामाप्र स्त्री
 • साखरा - नामाप्र
 • पुसनेर - नामाप्र
 • चिखली वैद्य - सर्वसाधारण स्त्री
 • वडाळा - सर्वसाधारण
 • खेड पिंपरी - अनुसूचित जाती
 • सावनेर - सर्वसाधारण स्त्री
 • रोहणा - नामाप्र
 • पिंपळगाव बैनाई - अनुसूचित जाती
 • शेलगुंड - सर्वसाधारण स्त्री
 • येवती - सर्वसाधारण स्त्री
 • लोहगाव - सर्वसाधारण स्त्री
 • काजना - सर्वसाधारण
 • पाळा - नामाप्र
 • भगुरा - अनुसूचित जाती
बातम्या आणखी आहेत...