आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

70 टक्के:करजगाव फीडरची वीजहानी 70 टक्के

अमरावती13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात महावितरणच्या अचलपूर विभागांतर्गत असलेल्या करजगाव फीडरवर होत असलेल्या वीज चोरीमुळे फीडरची हानी ७० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. मागील दोन महिन्यात या वाहिनीवरील ९२ ग्राहकांनी १९ लाख रूपयाची वीज चोरी केल्याचे उघड करण्यात आले आहे. त्यामुळे महावितरणकडून सुरू असलेल्या मीटर तपासणी मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांनी केले आहे.

करजगाव फीडरवर होत असलेल्या वीज चोरीची महावितरणच्या मुख्य कार्यालयानेही दखल घेत वीजहानी कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सप्टेंबर २०२२ पासून मोहिमेदरम्यान ९२ ग्राहकांकडून १ लाख ४६ हजार युनिट, १९ लाख रूपयाची वीज चोरी केल्याचे उघड करण्यात आले आहे. परंतू काही ग्राहकांकडून या मोहिमेला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, असेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...