आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्या:७० वर्षीय वृद्धाने केली रखलवालदाराची हत्या, संजीवनीनगरातील घटना; विळ्याने केले मानेवर वार

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुलीवंदनाच्या दिवशी (दि. १८) उशिरा रात्री एका ७० वर्षीय वृध्दाने त्याच्या हेटीवर रखवालदारीचे काम करणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीचा विळ्याने गळा चिरुन खून केला. घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलिसांनी तत्काळ मारेकरी वृद्धाला अटक केली.

विठ्ठल अमृत काकडे ७० रा. निंभोरा (ह. मु. संजीवनीनगर, परिसरातील शेतात) असे अटक केलेल्या मारेकरी वृद्धाचे तर सुनील मालवे (४०, रा. जनुना) असे मृताचे नाव आहे. विठ्ठल काकडेने शहरातील अकोली भागात असलेल्या संजीवनीनगर परिसरातील एक शेत मक्त्याने माहितीसाठी घेतले आहे. याच शेतात काकडेची हेटी (गुरे ठेवण्याची जागा) आहे. त्या ठिकाणी गुरं ठेवली आहेत. याच गुरांवर रखवालदारीसाठी मागील दोन महिन्यांपासून मालवेला ठेवले होते. दरम्यान, काकडेसुद्धा हेटीवरच राहत होता. धूलिवंदनाच्या दिवशी रात्री हेटीवर असतानाच काकडे व मालवे यांच्यात काहीतरी वाद झाला. याच वादातून काकडेने मालवेच्या मानेवर विळ्याने वार केला.

यावेळी मालवेचा गळा चिरल्यामुळे गंभीर जखम झाली व मालवे घटनास्थळी रक्तबंबाळ झाला. या घटनेची माहिती बडनेरा पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच ठाणेदार बाबाराव अवचार तातडीने घटनास्थळी पोहोचले. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली. तसेच विठ्ठल काकडेला ताब्यात घेऊन अटक केली आहे.

मारेकरी अटकेत
विठ्ठल काकडेने मक्त्याने वाहिलेल्या शेतात हेटी (गुरे ठेवण्याची जागा) आहे. याच हेटीवर रखवालदार म्हणून मालवे होता. शुक्रवारी रात्री यांच्यात वाद झाला. त्यावेळी काकडेने मालवेच्या गळ्यावर विळ्याने वार करुन खून केला. या प्रकरणी विठ्ठल काकडेला अटक केली आहे. बाबाराव अवचार, ठाणेदार, बडनेरा.

बातम्या आणखी आहेत...