आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचाऱ्यांची नियुक्ती:जिल्ह्यातील 7190 उमेदवारांनी दिली ‘एमपीएससी’ पूर्व परीक्षा

अमरावती21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येत असलेली महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२२ शनिवारी शहरातील विविध ३० केंद्रांवर पार पडली. जिल्ह्यातील ८ हजार ६७२ विद्यार्थी परीक्षेस पात्र ठरले होते. त्यापैकी ७ हजार १९० उमेदवारांनी परीक्षा दिली तर १ हजार ४८३ परीक्षार्थी विविध कारणांनी गैरहजर होते. परीक्षा केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ९५० अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती.

शनिवारी महाराष्ट्र गट-क सेवा पूर्वपरीक्षा २०२२ घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील ८ हजार ६७२ उमेदवार परीक्षेकरिता पात्र ठरले होते. त्यासाठी शहरातील ३० विविध केंद्र होते. यामध्ये ज्ञानमाता, होलिक्रॉस, विद्याभारती यासारख्या महाविद्यालय केंद्रांचा समावेश होता. ही परीक्षा कर सहाय्यक ४८१, मराठी टंकलेखक ८९ तर इंग्रजी टंकलेखक १०, उद्योग निरीक्षक ६, अॅक्स्स एसआय ९ असे एकूण ५९५ पदांसाठी घेण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...