आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वान प्रकल्पाचे दरवाजे उघडले:प्रकल्पात 73 टक्के जलसाठा, गावांना इशारा

संग्रामपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या दमदार पावसामुळे तीन जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या वाण प्रकल्पात ७३ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ६ ऑगस्ट रोजी या धरणाचे चार दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. परंतु मागील दोन दिवसापासुन पाण्याची आवक कमी झाल्यामुळे दाेन दरवाजातुन तीस. से.मी. ने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने नदी काठावरील गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

मागील तीन चार दिवसांपासून सातपुडा पर्वतासह मध्यप्रदेशात होत असलेल्या पावसामुळे वान प्रकल्पात ७३ टक्के जलसाठा उपलब्ध झाला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ६ ऑगस्ट रोजी या प्रकल्पाचे चार दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. परंतु काल शनिवार पासुन पाण्याची आवक कमी झाल्यामुळे दोन दरवाजे बंद करण्यात आले आहेत. तर सध्या स्थितीत दोन दरवाजातून तीस से.मी. ने २८.८६ दलघमी पाण्याचा नदीत विसर्ग करण्यात येत आहे. सध्या वान प्रकल्पात ७३ टक्के पाणी साठा उपलब्ध असून वान प्रकल्पाच्या मंजूर जलाशय परिचालन सुची नुसार जल साठा आहे. प्रकल्पात पाण्याची आवक वाढल्यास केव्हांही पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे.

बातम्या आणखी आहेत...