आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त अमरावती ते अकोलादरम्यान लोणी गावाजवळून मूर्तिजापूरलगत कमळगंगा नदीपर्यंतच्या महामार्गावर ७५ किमी अंतरात १०८ तासांच्या विक्रमी वेळात डांबरीकरणाचा पाचवा व अंतिम थर देण्यात येणार आहे. यापूर्वी कतारमध्ये सहा दिवसांत २५ किमी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्याची “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड’ मध्ये नाेंद झाली आहे.
गिनीजमध्ये नोंदीची शक्यता
राजपथ इन्फ्रा कंपनी हे काम करत आहे. कंपनीने सांगली-सातारा भागात २४ तासांत ३९ किमी रस्ता बांधला होता. “इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’मध्ये त्याची नोंद झाली आहे. आता अमरावती-अकोला रस्त्याच्या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्याची शक्यता आहे.
206 हायवा, डंपर या कामासाठी वापरले जातील.
याच रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम ३ जूनला सकाळी ७ वा. सुरू होणार असून ७ जूनच्या दुपारपर्यंत पूर्ण केले जाणार आहे.
01 पेव्हर मशीन
08 टँडम रोलर, टायर रोलर
अहोरात्र काम करणार
^३ जून रोजी सकाळी ७ वा. कामाला सुरुवात होणार असून ७ जून रोजी दुपारपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याने अहोरात्र काम सुरू राहणार आहे. त्यासाठी वाहतूक वळवण्यापासून मनुष्यबळापर्यंतची सर्व व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे. निसर्गाने साथ दिल्यास हा एक विक्रमच ठरणार आहे. या वेळी ‘गिनीज’चे प्रतिनिधी व कामाचा दर्जा तपासणाऱ्या लॅब सज्ज राहणार आहेत.
विलास ब्राह्मणकर, महाव्यवस्थापक, महामार्ग प्राधिकरण
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.