आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लुटमार करणाऱ्या सात‎ जणांवर लावला मोक्का‎:राजापेठ हद्दीतील 8 लाख रोकड लुटीची घटना‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत‎ चाकूच्या धाकावर आठ लाख‎ लुटणाऱ्या सात आरोपींविरोधात‎ शहर पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत‎ गुन्हेगारी कायदा (मोक्का) लावला‎ आहे. याबाबतची माहिती बुधवारी‎ पोलिस उपायुक्त विक्रम साळी यांनी‎ पत्रकार परिषदेत दिली.‎ पत्रपरिषदेत उपायुक्त विक्रम‎ साळी यांनी सांगितले की,‎ शहरातील रविनगर परिसरातील‎ रहिवासी कृपालसिंग ठाकूर‎ व्यावसायिकांकडून गोळा करण्यात‎ आलेले आठ लक्ष रूपये घेवून घरी‎ जात होता. भुतेश्वर चौक‎ परिसरातून जात असतांना त्याला‎ चाकूचा धाक दाखवून रोकड‎ लूटण्यात आली होती. राजापेठ‎ पोलिसांनी याप्रकरणी १८ मार्च रोजी‎ सात आरोपीचा शोध घेवून निष्पन्न‎ केले होते. त्यांच्यावर लुटमारीचे‎ गुन्हा दाखल करण्यात आला होता.‎

यात शेख चुन्नू शेख सलीम (३१,‎ रा. चांदणी चौक), इलीयास अली‎ अहमद अली (२४, बिसमिल्ला‎ नगर), सैय्यद समीर सैय्यद जमीर‎ (३०, ताजनगर) व तेजस संजय‎ धोटे (२१) यांना अटक केली होती.‎ अटकेदरम्यान शेख चुन्नू शेख‎ सलीम हा लूटमार करणाऱ्या‎ टोळीचा सूत्रधार आहे. सदर टोळी‎ विरोधात शहर पोलिस आयुक्तालय‎ हद्दीत विविध पोलिस ठाण्यात गुन्हे‎ दाखल असल्याचे सांगण्यात आले.‎

यामुळे पोलीस आयुक्त नवीनचंद्र‎ रेड्डी यांच्या परवानगीने सात‎ आरोपीविरोधात मोक्का गुन्ह्याची‎ वाढ करण्यात आली. आरोपींचा‎ शोध व अटकेची कारवाई सहायक‎ आयुक्त भारत गायकवाड, ठाणेदार‎ मनीष ठाकरे, निरीक्षक वी. वी.‎ वाकसे, उपनिरीक्षक काठेवाडे,‎ कर्मचारी सागर सरदार, छोटेलाल‎ यादव, ईश्वर चक्रे, नरेश मोहरील,‎ मनीष कळंबे, अतुल संभे, रवी‎ लिखितकर, सागर भजवगरे, विक्रम‎ देशमुख, विलास उईके व विकास‎ गुडधे यांनी केली.‎