आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळघाटामध्ये अघोरी उपचार:आठ महिन्यांच्या बाळाला दिले 80 चटके, पोटफुगी आजारावर तप्त लोखंडी वस्तूद्वारे डाग

अमरावती15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम बोरदा गावात श्याम सज्जू तोटा या ८ महिन्यांच्या चिमुकल्याला पोटफुगीचा त्रास (मेळघाटमध्ये यालाच फोफ्सा म्हणतात) झाल्यामुळे त्याच्या पालकांनी गावातील दाईकडून या कोवळ्या मुलाच्या पोटावर ७० ते ८० चटके म्हणजे डंबा दिला. या प्रकारामुळे बाळाची प्रकृती गंभीर झाली. ही बाब वैद्यकीय यंत्रणेला माहीत झाल्यानंतर त्या बाळाला अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुमारे आठ ते दहा दिवस उपचार घेतल्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती.

या प्रकरणात काटकुंभच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चिखलदरा पोलिसात तक्रार दिली होती. त्यामुळे पोलिसांनी बाळाचे वडील व डंबा देणाऱ्या दाईविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. मेळघाटातील दुर्गम गावांमध्ये बाळांना पोटफुगी किंवा पोटदुखीचा त्रास झाल्यास बाळाला भुमका किंवा दाईकडून उपचार घेतल्यास डंबा देण्यात येतो. डंबा देणे म्हणजे बाळाला असह्य वेदना होत नाहीत, हलक्या हाताने चटके दिले जातात, त्या भागात हा सामान्य प्रकार असलयाचे सांगण्यात येते.

तीन वर्षांच्या मुलालाही दिले चटके
अशीच घटना ३ जून २०२१ ला पुन्हा उघडकीस आली. चिखलदरा तालुक्यातीलच खटकाली या गावात ३ वर्षीय राजरत्न जामुकर या बालकाला पोटदुखीचा त्रास झाला व त्याला भुमकाद्वारे डंबा देण्यात आला. मागील आठ दिवसांपासून बाळ आजारी होते, त्यामुळे पालकांनी त्याला भुमकाकडे नेले, त्या वेळी त्याच्या पोटाला चटके देण्यात आले. मात्र बालकाची प्रकृती खालावल्यामुळे त्याला अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणात अद्याप पोलिस कारवाई झाली नाही. असे प्रकार चिखलदाऱ्यात होत आहेत.

बातम्या आणखी आहेत...