आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • 86.82 Percent Voter Turnout For 'Shivaji' New Shiledars 10 Candidates For President, 2 Each For Treasurer Post, 7 For Vice President 3 Posts, 10 Candidates For 4 Member Posts.

‘शिवाजी’च्या नव्या शिलेदारांसाठी 86.82 टक्के मतदान:अध्यक्ष, कोषाध्यक्ष, उपाध्यक्षांसह कार्यकारिणी सदस्यपदासाठी निवडणूक

अमरावती24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
मतदान स्थळ असलेल्या श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्रांगण शिव परिवारातील मतदारांनी असे फुलून गेले होते. - Divya Marathi
मतदान स्थळ असलेल्या श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्रांगण शिव परिवारातील मतदारांनी असे फुलून गेले होते.

श्री. शिवाजी शिक्षण संस्थेच्या नऊ सदस्यीय कार्यकारी मंडळासाठी आज, रविवारी पार पडलेल्या मतदानात 86. 82 टक्के मतदान झाले. शिवाजीच्या मतदार यादीत सध्या एकूण 814 मतदार आहेत. यापैकी आजघडीला 774 मतदार हयात आहेत. त्यापैकी 672 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

अध्यक्ष व कोषाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी दोन, उपाध्यक्षांच्या तीन पदासाठी 7 आणि कार्यकारिणी सदस्याच्या चार जागांसाठी 10 उमेदवार मैदानात आहेत. सदर संस्थेची पंचवार्षिक आमसभा शनिवारी सकाळी श्री. शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली. या सभेनंतर लगेच त्याठिकाणी 21 इच्छूकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

मावळते अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वातील प्रगती पॅनल आणि उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे (जे स्वत: यावेळी अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत) यांच्या नेतृत्वाखालील विकास पॅनल या दोहोंमध्ये ही निवडणूक होत आहे. निवडणूक अधिकारी अ‌ॅड. बी. के. गांधी तसेच संस्थेचे सचिव शेषराव खाडे यांच्या कार्यालयीन सूत्रानुसार सकाळी 8 वाजता मतदानास प्रारंभ झाला. एकूण पाच मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यापैकी पाचव्या क्रमांकाचे केंद्र अंध, अपंग, दीर्घ आजारी किंवा रुग्णालयात दाखल असलेल्या मतदारांसाठी राखीव ठेवण्यात आले होते.

पहिल्या तीन केंद्रावर प्रत्येकी अडीचशे तर चौथ्या मतदान केंद्रावर 24 मतदारांची व्यवस्था करण्यात आली होती. सहायक निवडणूक अधिकारी म्हणून अ‌ॅड. सुरेंद्र देशमुख व श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेला मदत केली.

31 महिला मतदारही

एकूण 774 मतदारांमध्ये 31 महिला मतदारांचाही समावेश आहे. यापैकी बहुतेक महिला मतदारांनी मतदानाच्या प्रक्रियेत सहभाग नोंदविला. भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी स्थापन केलेल्या या संस्थेत सुरुवातीला सुमारे 2700 मतदार होते.

वयोमानपरत्वे त्यातील अनेक व्यक्ती सध्या हयात नाहीत. त्यामुळे ही संख्या घटून 774 वर आली आहे. मुळात निवडणूक प्रक्रिया सुरु झाली तेव्हा 814 जणांची यादी तयार झाली होती. गेल्या काही महिन्याच्या काळात त्यातील 40 जण काळाच्या पडद्याआड गेले.

रुग्णवाहिकेतून पोहोचलेले काही मतदार.
रुग्णवाहिकेतून पोहोचलेले काही मतदार.
बातम्या आणखी आहेत...