आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

46 लघु प्रकल्प:54 प्रकल्पांत 89.99 टक्के साठा

अमरावती15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त पाऊस झाल्याने अमरावती जिल्ह्यातील एक मोठा व सात मध्यम आणि ४६ लघु असे एकूण ५४ प्रकल्पांत पाणीसाठा सरासरी ८९.९९ टक्के असून मागील वर्षी याच दिवशी १९ नोव्हेंबर रोजी ८५.६० टक्के होता. यंदा जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प प्रथमच तुंबून भरले आहेत. यामध्ये अप्पर वर्धा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, त्याची ९९.५१ इतकी टक्केवारी आहे. तर उरलेल्या इतर प्रकल्पांमध्येही कमालीची पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे यावर्षी शेती, औद्योगिक आणि पिण्याच्या पाण्याची समस्या नागरिकांना निर्माण होणार नसल्याचे जलसंधारण विभागाचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात मोठा १, मध्यम ७, लघु ४६ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांतील पाण्यावरच सिंचन तसेच पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागत असतो. मागील दोन-तीन वर्षे जिल्ह्यात अल्प पर्जन्यमान झाल्यामुळे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. ज्या प्रकल्पात पाणी उपलब्ध होते तेही प्रकल्प फेब्रुवारी महिन्यापासूनच कोरडे पडत असत. त्यामुळे पशूंच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर होत असे.

शिवाय पिण्याच्या पाण्यासाठीही नागरिकांना भटकंती करावी लागत होती. गतवर्षीही मार्च, एप्रिल महिन्यात अनेक प्रकल्प कोरडे पडले होते. त्यामुळे काही भागात अधिग्रहणे तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. मात्र, यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला. त्यानंतर अधून-मधून सतत पाऊस पडत राहीला. काही भागात अतिवृष्टीही झाली. सततच्या पावसामुळे प्रकल्पांत पाण्याची आवक होत राहिल्याने मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वच प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहे.

जिल्ह्यातील एक मोठा अप्पर वर्धा तर शहानूर, चंद्रभागा, पूर्णा, सपन, पंढरी, गर्गा, बोर्डी नाला या सात मध्यम प्रकल्प आणि ४६ लघु प्रकल्प मिळून ८९.९९ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. ज्यामध्ये शहानुर, चंद्रभागा, पूर्णा सपन, पंढरी, बोर्डी नाला, गर्गा मिळून ७१.०८ टक्के पाणीसाठा आहे. तत्पुर्वी, मुबलक पाणी साठ्यामुळे रब्बी हंगामात उत्पादनातही वाढ झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...