आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांचा सुटकेचा श्वास:एमआयडीसीमध्ये आढळला 9 फुटांचा अजगर ; सर्पमित्रांच्या सहाय्याने रेस्क्यू

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील एमआयडीसीतील गोपालनगरस्थित मालपाणी यांच्या कंपनीजवळ शुक्रवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान एक ९ फुटाचा अजगर आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सर्पमित्रांच्या सहाय्याने त्या अजगराचे रेस्क्यू करून त्याला सुखरूप जंगलात सोडून देण्यात आले.

शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास मालपाणी यांच्या कंपनीजवळ अक्षय कुर्जेकर या युवकाला सरपटणारा प्राणी दिसला. त्याने लगेचच सर्पमित्र विशाल तोमर यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. दरम्यान सर्पमित्राने दिलेल्या सूचनेनुसार कुर्जेकर यांनी रेस्क्यू टीम येईपर्यंत त्याच्यावर पाळत ठेवली. सर्पमित्रांनी तातडीने सर्व खबरदारी घेत रेस्क्यू करून ९ फुटांचा अजगर ताब्यात घेतला. दुसऱ्या दिवशी त्या अजगराला सुखरूप जंगलात नेऊन सोडले. या वेळी सर्पमित्र विशाल तोमर, कार्तिक तोमर, पवन बघल्ले, करण सुपलकर, जय चौधरी, रोहित आदींसह सर्पमित्र उपस्थित होते. अजगराला पकडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.

बातम्या आणखी आहेत...