आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात एसटीची वाहतूक आता पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील ८ आगार मधील जवळपास २४०० कर्मचारी आतापर्यंत कामावर परतले आहेत. अमरावती डेपोतून लांब सल्ल्यासह जिल्हाअंर्तगत एसटी वाहतूकही सुरू झाली आहे. मागील ५-६ महिन्यांपासून सुरू असलेला संप आणि त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे हाल या सर्वांना आता पूर्णविराम मिळाला आहे. १० जूनच्या महामंडळाच्या अहवालानुसार, २९७ बसमध्ये ६७ हजार ५८४ प्रवाशांनी प्रवास केला असून, त्या एक दिवसाच उत्पन्न हे ३८ लाख ८४ हजार १० इतके वाढले आहे. राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, अन्य सरकारी करणाऱ्यांप्रमाणेच एसटीच्या चालक-वाहकांना आर्थिक लाभ मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी महामंडळाचे राज्यभरातील चालक-वाहक दिवाळी पासून बेमुदत संपावर होते. प्रवाशांची गैरसोय होत होती, मात्र, हायकोर्टाच्या आदेशानुसार, सर्व कर्मचारी कामावर परतले आहे. त्यामुळे एसटीची सेवा पूर्वपदावर आली असून, ९५ टक्क्यांच्या वर बस पूर्ववत झाल्या आहेत. एसटी महामंडळाच्या ७ मे च्या अहवालानुसार, २८३ बस धावल्या असून, ५८ हजार २४७ प्रवाशांनी प्रवास केला. यामध्ये एका दिवशीच उत्पन्न हे ३१ लाख ८३ हजार ७७० इतके होते. त्यानंतर एसटीच्या उत्पन्नात हळूहळू वाढ होत गेली. १० जूनच्या अहवालावर दृष्टिक्षेप टाकला असता २८७ बस रस्त्यावर धावल्या असून, यामध्ये ६७ हजार ५८४ प्रवाशांनी प्रवास केला. या दिवशी ३८ लाख ८४ हजार ०१० एवढे उत्पन्न झाले आहे.
सर्व एसटी कर्मचारी परतले कामावर सहा महिन्यांच्या कालावधीनंतर एसटी कर्मचारी कामावर परतले आहे. आतापर्यंत सरासरी ९० ते ९५ टक्के बससेवा पूर्ववत झाली आहे. पुढे शाळा, महाविद्यालये सुरू झाल्यानंतर शैक्षणिक पासेसची मागणी असणार आहे. श्रीकांत गभने, विभागीय नियंत्रक.
एसटी आमचा आधार ^एसटी सुरू झाल्याने खासगी वाहनाने प्रवास करावा लागणार नाही. आता शेतीच्या मशागतीसह पेरणीचे कामे तोंडावर आले. साहित्य, बियाणे आणायला एसटी शिवाय पर्याय नाही. गावापर्यंत पोहोचणारी एसटी ही सर्वसामान्य माणसाचा प्रवासाचा आधार आहे. विजय मनोहर, प्रवासी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.