आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराया मेळाव्याला महाविद्यालयाच्या प्रारंभीच्या काळात शिक्षण घेतलेले विद्यार्थी उपस्थित राहतील, याची अजिबात कल्पना नव्हती. त्यामुळे नव्वद वर्षीय शालीग्राम रामचंद्र गोटखडे यांची उपस्थिती ही आयोजकांना आश्चर्याचा धक्का देणारी ठरली. विचारपीठासमोर धोतर, पांढरा शर्ट व गळ्यात दुपट्टा घालून बसलेले वयोवृद्ध गृहस्थ हे महाविद्यालयाचे १९५२ ते १९५७ या काळातील विद्यार्थी आहेत, याची माहिती मिळताच आयोजकांनी त्यांना सन्मानाने विचारपीठावर बसवले आणि त्यांचा यथोचित सन्मान केल. अमरावती येथील शिवाजी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात भावना व्यक्त करताना ९० वर्षीय माजी विद्यार्थी शालीग्राम गोटखडे. यावेळी मंचावर उपस्थित प्राचार्य डॉ. भिसे व इतर मान्यवर. अमरावती| डॉ. पंजाबराव देशमुख हे ‘शिक्षणमहर्षी’ नव्हते तर ते ‘शिक्षण भगीरथ’ होते. त्यांनी शिक्षणाची गंगा स्वर्गातून आणली होती. त्यामुळे आमच्यासारखे गोर-गरीब शिकू शकले. पंजाबराव आणि विमलताई हे जोडपं देवासारखं पृथ्वीतलावर अवतरलं. आज या महाविद्यालयाला ७५ वर्षे पूर्ण झाली. आणखी एक लाख वर्षे या महाविद्यालयाला पूर्ण होतील. कारण ही पुण्यभूमी आहे, या शब्दात श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे १९५७ मध्ये पदवीधर झालेले विद्यार्थी शालीग्राम रामचंद्र गोटखडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थी संघाच्या वतीने माजी मंत्री सुरेंद्र भुयार यांच्या अध्यक्षतेखाली माजी विद्यार्थी मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, आमदार सुलभाताई खोडके, गोंदियाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश खवले, अॅड. राजाभाऊ गिरनाळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विचारपीठावर माजी विद्यार्थी संघाचे सचिव प्रशांत डवरे, प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, ग्रंथपाल डॉ. महेंद्र मेटे, माजी प्राचार्य डॉ. रमेश अंधारे व समन्वयक डॉ. नितीन चांगोले यांचीही उपस्थिती होती. डॉ. कुमार बोबडे यांनी प्रास्ताविक केले. माजी विद्यार्थी सुभाष पावडे, विनायक पुंडकर, प्राचार्य डॉ.प्यारेलाल सूर्यवंशी, शरद जवंजाळ, नंदू शेरेवर, आशिष इखे, अमोल चवणे, पंकज वैद्य आदी माजी विद्यार्थ्यांचे माजी विद्यार्थी संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले. डॉ. मनोज जोशी यांनी संचालन केले तर आभार डॉ. राजेश मिरगे यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.