आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:अमरावती जिल्ह्याचा 96.41 टक्के निकाल; मुलीच वरचढ

अमरावती23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती विभागाचा सरासरी निकाल ९६.३४ टक्के असला तरी जिल्हा मुख्यालयाने मात्र त्याहून तीन टक्के जास्त निकाल दिला आहे. नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली असून, उत्तीर्णतेच्या टक्केवारीत त्यांची संख्या ९६.०५ टक्के आहे. त्याचवेळी मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.५२ वर थांबली आहे.

बारावीचा निकाल बुधवारी घोषित झाला. जिल्ह्यातील ३७ हजार ७५ विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरला होता. त्यापैकी ३६,७५३ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले, तर ३५,४३६ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. यात मुलींची संख्या १७,१७५, तर मुलांची संख्या १८,२६१ आहे. आकडेवारीवरून मुलांची संख्या अधिक दिसत असली तरी टक्केवारीच्या भाषेत बोलायचे झाल्यास मुलींची संख्या मुलांपेक्षा अर्धा टक्का अधिक आहे.

बातम्या आणखी आहेत...