आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूखंड विक्रीतून मनपाला दुप्पट फायदा:6 भुखंड विक्रीतून 97 लाख 50 हजार 704 रुपयांचा लाभ

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मनपाने विक्रीस काढलेल्या रहाटगांव येथील 6 भुखंडांच्या विक्रीतून मनपाला दुप्पट फायदा झाला. आधारभूत किंमतीपेक्षा 97 लाख 50 हजार 704 रुपयांचा लाभ झाला आहे. या भुखंडांची आधारभूत किंमत 80 लाख 46 हजार 350 रुपये ठेवली होती, हे विशेष!

मनपाच्या मालकीच्या भुखंडांचा वापर व्हावा, या उद्देशाने आयुक्त डाॅ. प्रवीण आष्टीकर यांच्या निर्देशांनुसार ई-निविदा काढल्यानंतर ६ भुखंडांसाठी १७० अर्ज मनपाकडे सादर करण्यात आले होते. तांत्रिक निविदा उघडल्यानंतर आर्थिक निविदा उघडण्यात आली. भुखंड क्र. ६ करिता आधारभूत किंमत २५ लाख ३६ हजार ८५० ठेवण्यात आली होती. या भुखंडासाठी ई-निवेदात सर्वाधिक ५२ लाख ८ हजार ५०० रु. रक्कम भरण्यात आली.

भुखंड क्र. ७ बीसाटी आधारभूत किंमत ८ लाख ६० हजार असताना १५ लाख ७६ हजार किंमत मिळाली. भुखंड क्र. १०ए साठी अपेक्षित किंमत ११ लाख ७ हजार असताना २८ लाख ९ हजार ३७६ रु. किंमत मिळाली. भुखंड क्र. १० बी करिता आधारभूत किंमत ११ लाख ७ हजार ठेवण्यात आली. परंतु, ई-निविदेत २७ लाख रु. किंमत मिळाली. भुखंड क्र. ११ ए साठी अपेक्षित किंमत ११ लाग ७ हजार असताना २६ लाख ३१ हजार ८०४ रु. किंमत मिळाली आहे. त्याचप्रमाणे भुखंड क्र. ११ बी करिता आधारभूत किंमत १३ लाख २८ हजार ५०० रु. ठेवण्यात आली होती. या भुखंडाला २८ लाख ७१ हजार ३७५ रु. किंमत मिळाली आहे.

सहाही भुखंडांसाठी एकूण आधारभूत किंमत ८० लाख ४६ हजार ३५० ठेवण्यात आली होती. ई-निविदेत एकूण १ कोटी ७७ लाख ९७ हजार ५४ रु. अर्थात दुप्पट किंमत मनपाला प्राप्त होणार आहे. मनपाने भुखंड विक्रीसाठी प्रथमच निविदा प्रक्रिया राबवून अर्ज मागविले होते.

मनपा आयुक्त, सहायक संचालक नगर रचना आशिष उईके व त्यांच्या विभागातील कर्मचारी तसेच जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर व त्यांच्या विभागाने ही प्रक्रिया राबविल्यामुळे त्यांचे अभिनंदन होत आहे.

बातम्या आणखी आहेत...