आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील ३० शाळांचा दहावीचा निकाल ९७.५५ टक्के लागला असून १ हजार ८३७ विद्यार्थ्यांपैकी १ हजार ७९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. शहरातील सेफला हायस्कूलचा वेदांत नंदेश्वर ९८.२० टक्के गुण घेत तालुक्यातून प्रथम आला आहे. श्रीमती हिराबाई गोयनका कन्या विद्यालयाने आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. येथील ऋतुजा धवने हिने ९७ टक्के गुण प्राप्त करून विद्यालयातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.
सेफला हायस्कूलच्या वेदांत नंदेश्वर, यश ताजणे, सानिया रामटेके, युतीका राठी, धनश्री खंडेलवाल, आर्या धांदे, दर्शन दहाट, रसिका तिवारी, ओजस वानखडे, उत्कर्ष सुरंदसे, धनश्री राठी, एकता गांधी, प्रतीक्षा सुळके, कृष्णा तिवारी, जिज्ञासा रिंगे, पूजा मिटणापुरे, सुमित मुंधडा, जान्हवी पांडे, लोचन खडसे, हरीश पणपालीया, गौरी अग्रवाल, सृष्टी गायनर, ओम नरोळे, आर्यन हजारे, सुयोग वैद्य, सुहानी थोटे, परी रांका, अभिषेक तितरे, माधवी पुणसे, करण ठाकरे, वेद गौंडीक, प्रेरणा वैरागडे, भूमी पालिवाल, प्रसन्न गुल्हाने, प्रद्युम्न सोनी, देवयानी उघडे, लवकेश कापडे, कृष्णा तापडिया, पलक पनपालिया, खुशी नंदागवळी, कुणाल काळे, गौरी बेले, कार्तिक डफळे या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. श्रीमती हिराबाई गोयनका कन्या विद्यालयचा निकाल शंभर टक्के लागला असून २३ विद्यार्थिनींनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.
तालुक्यातील या शाळांनी घेतली भरारी : तालुक्यातील १५ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून यामध्ये माधवराव वानखडे विद्यालय (विरुळ रोंघे), नगर परिषद उर्दू माध्यमिक शाळा, नंदलाल लोया कन्या विद्यालय, देवराव ठाकरे विद्यालय (अशोकनगर), अशोक विद्यालय (जळका पटाचे), कृषक विद्यालय (निंबोरा), एकता विद्यालय (शेंदुर्जना खुर्द), कृषक विद्यालय (चिचपूर), शासकीय मुलींची निवासी शाळा (हिंगणगाव), श्री साईबाबा विद्यालय (अंजनसिंगी), आरोही डिजिटल स्कूल, संतोषराव गोळे विद्यालय (मंगरूळ दस्तगिर), मदर टेरेसा स्कूल (अंजनसिंगी) व डॉ. मुकुंदराव पवार सैनिकी विद्यालय यांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.