आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाकूने हल्ला:लाहोटी महाविद्यालयासमोर १७ वर्षीय तरुणाची चाकूने हल्ला चढवून हत्या

अमरावती6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका १७ वर्षीय तरुणाची चाकूने नऊ ते दहा वार करून हत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५ ते ६ च्या सुमारास गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील केशरबाई लाहोटी महाविद्यालयासमोर घडली. सहा महिन्यांपूर्वी याच तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे पूर्ववैमनस्यातून त्याची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

विकास शंकर गायकवाड (१७, रा. भीमनगर) असे मृतकाचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी विकास हा केशरबाई लाहोटी महाविद्यालयासमोर उभा होता. या वेळी तीन ते चार हल्लेखोरांनी त्याला गाठले. हल्लेखोरांनी अचानक विकासवर चाकूने हल्ला चढवला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला विकास हा रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. त्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यावर गाडगेनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच ठाणेदार आसाराम चोरमले यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले व जखमी विकासला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी विकासला मृत घोषित केले. जानेवारी महिन्यात विकासवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विकासच्या मारेकऱ्यांची नावे अद्याप समोर आली नसून, या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे.

बातम्या आणखी आहेत...