आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवदान‎:खेरी गावात 5 फुटांच्या‎ अजगराला दिले जीवदान‎

अमरावती24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ आसेगाव पूर्णा जवळील खेरी गावात ५‎ फुटांचा अजगर आढळल्यानंतर‎ गावकऱ्यांमध्ये भितीमिश्रित आश्चर्याचे‎ वातावरण होते. या घटनेची माहिती‎ स्थानिक सर्प मित्रांना देण्यात आली. त्यांनी‎ अजगराचा सुखरूप बचाव करून त्याला‎ जंगलात सोडलेे.

गावकरी शुभम गावंडे‎ यांना त्यांच्या घराच्या आवारात साप‎ दिसल्यानंतर त्यांनी सर्पमित्र हर्ष वाडे,‎ पीयूष थोटे यांना माहिती दिली. त्यांनी लगेच‎ गावंडे यांच्या घरी पोहोचून सापाची पाहणी‎ केली असता त्यांना तो अजगर असल्याचे‎ आढळले. तत्काळ परतवाडा वनपरिक्षेत्र‎ कार्यालयाला माहिती देण्यात आली.‎ त्यानंतर अजगराला पकडून सुखरूप‎ जंगलात सोडण्यात आले. अजगराचा‎ बचाव करून त्याला सुरक्षित जंगलात‎ सोडल्याबद्दल गावातील नागरिकांनी‎ सर्पमित्रांचे आभार मानले.‎

बातम्या आणखी आहेत...