आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:जेसीबीला धडकून 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

अंजनगाव सुर्जी8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातून भाजीपाला घेऊन निमखेड येथे जात असताना अंजनगाव-अकोट मार्गावरील कचरा डेपोजवळ उभ्या असलेल्या जेसीबीला धडक लागून भगवान नारायण खडसे (७०) नामक वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजता घडली.

घटनेच्या वेळी ते दुचाकीने (एमएच २७/ बीजे १६४४) भाजीपाला घेऊन घरी जात असताना नगरपालिकेच्या कचरा डेपो जवळ उभी असलेल्या जेसीबी (एमएच २७/ बी झेड ५८३२) धडक लागून ते रस्त्यावर पडले. त्यांना अंजनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या मुलाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी जेसीबी चालक सतीश जोतीराम सुर्वे (२७) यांच्यावर गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...