आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:अ. भा. रिपब्लिकन पक्षाचा आज कार्यकर्ता मेळावा

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंतीनिमित्त राज्यात २५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरपर्यंत जनचेतना अभियान राबवण्यात येत आहे.या अभियानांतर्गत रविवारी (दि. २) स्थानिक जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाचे पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार असून, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील करणार आहेत.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण खोब्रागडे, सरचिटणीस प्रा. अशोक निमगडे, प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय बोरकर, प्रदेश कार्याध्यक्ष मिलिंद तायडे आदी मान्यवर या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...