आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:परतवाड्यात रस्ता ओलांडताना‎ दुचाकीची धडक; वृद्धाचा मृत्यू‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतवाडा येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ एका ६४‎ वर्षीय व्यक्तीला रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक‎ दिली. या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. ही घटना‎ नुकतीच घडली असून, या प्रकरणी रविवारी दुपारी‎ धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध परतवाडा‎ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अशोक पुंडलिकराव‎ काळे (६४, रा. देवमाळी) असे मृतक व्यक्तीचे नाव‎ आहे. अशोक काळे हे ३ फेब्रुवारीला सकाळी दहा ते‎ साडेदहाच्या सुमारास रिलायन्स पेट्रोल पंपाजवळून‎ रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी त्यांना एका‎ दुचाकीस्वाराने जबर धडक दिली. या धडकेत त्यांचा‎ मृत्यू झाला. या प्रकरणी नीलेश अशोकराव काळे‎ यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दुचाकीस्वाराविरुद्ध‎ गुन्हा दाखल केला.‎

बातम्या आणखी आहेत...