आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सवात पर्यावरणाचा जागर:घरगुती मातीच्या मुर्ती घरीच विसर्जीत करण्याचे आवाहन; पर्यावरणासाठी सामाजिक संघटनांचा पुढाकार

अमरावती19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणपती विसर्जन सोहळा अधिकाधिक पर्यावरणपुरक पद्धतीने व्हावा, यासाठी मनपासह, नगर परिषद, नगर पंचायतींतर्फे मोठ्या प्रमाणात निर्माल्य संकलन मोहीम राबविण्यात येत आहे. शहरासह ग्रामीण भागातील संघटनांनीही त्यासाठी पुढाकार घेतला असून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

शुक्रवारी (ता. 9) गणेश विसर्जन आहे. दरम्यान नागरिकांना घरगुती मातीच्या गणपतींचे घरीच विसर्जन करून ती माती झाडांच्या उपयोगात आणावी, असे आवाहन विविध स्वयंसेवी संस्थाद्वारे करण्यात आले आहे, तर प्रशासनाने कृत्रिम तलावांमध्ये गणेशाचे विसर्जन करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. स्थानक प्रशासन, स्वयंसेवी संघटनांसह पोलिस प्रशासनदेखील सज्ज झाल्या आहे. स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांकडून गोळा करण्यात आलेले निर्माल्य स्थानिक प्रशासनाकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

मेळघाटात ‘पोलिस’ व ‘माजी सैनिक’चा पुढाकार

मेळघाटात गणेश विसर्जन शांततेत व्हावे यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. प्रशासनाच्या मदतीलाच माजी सैनिक संघटना व पोलिस पाटील संघटना धावून आल्या आहेत. चिखलदरा तालुक्यात सार्वजनिक गणपती उत्सव मंडळांचे गणपती हे स्थानिक पातळीवर पोलिस पाटिलांच्या मदतीने गाव, तलाव तसेच नदी ओढ्यांवर विसर्जित करण्यात येणार आहेत. गणेश मंडळांद्वारे ध्वनिप्रदूषण विरहित मिरवणूक काढून गडगा, तापी तसेच सीमावर्ती तापी नदीत विसर्जन करण्यात येणार आहे.

स्वयंसेवक राहणार तैनात

''नागरिकांनी मातीच्या गणपतींचे घरीच विसर्जन करावे, तर निर्माल्याचा उपयोग खत निर्मितीसाठी करावा. भाविकांनी नदीमध्ये आकलेल्या निर्माल्याने जलप्रदूषषण होवू नेये म्हणून छत्री तलाव परिसरात असलेल्या फॉरेस्टच्या नाल्यांवर प्रत्येकी दोन दोन स्वयंसेवक तैनात करण्यात येणार आहेत. त्यांच्याद्वारे गोहा करण्यात आलेले निर्माल्य पालिका प्रशासनाच्या सुपूर्द करण्यात येईल.'' - निलेश कांचनपुरे, अध्यक्ष, वाईल्ड लाईफ अवेरनेस रिसर्च अँड रेस्क्यू वेलफेअर सोसायटी.

संकलितनिर्माल्य पालिका प्रशासनाकडे

''मागील काही वर्षांपासून वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेद्वारे गणेशोत्सवादरम्यान निर्मालय पाण्यात न सोडण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. या वर्षीदेखील छत्री तलाव परिसरातल संस्थेचे 10 स्वयंसेवक तैनात राहणार असून त्यांच्या माध्यमातून गोळा केलेले निर्माल्य पालिका प्रशासनाकडे सोपविण्यात येईल.''- डॉ. जयंत वडतकर, सचिव, वन्यजी व पर्यावरण संवर्धन संस्था

बातम्या आणखी आहेत...