आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:रस्त्याच्या खाली गेलेली कार काढताना बसली दुसऱ्या कारची धडक; एक ठार

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर जिल्ह्यात कर्तव्यावर असलेल्या लहान भावाच्या कारचा अमरावती ते बडनेरा महामार्गावर अपघात झाल्याची माहिती मिळाल्यामुळे अमरावती शहरात राहणारे मोठे भाऊ अपघातस्थळी पोहोचले. यावेळी रस्त्याच्या खाली गेलेली कार काढत असतानाच अन्य एका कारने जोरदार धडक दिल्यामुळे पीएसआय जखमी झाले तर त्यांचे मोठे भाऊ मृत्यूमुखी पडले. ही घटना रविवारी (दि. ४) दुपारी घडली.

सुभाष नामदेवराव सुरजुसे (३७), रा. लघुवेतन कॉलनी, अमरावती असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे तर महादेव नामदेवराव सुरजुसे (३३) असे जखमी झालेल्या पीएसआयचे नाव आहे. महादेव सुरजुसे हे पीएसआय असून, नागपूर जिल्ह्यातील कन्हान पोलिस ठाण्यात ते कार्यरत आहेत. रविवारी दुपारी ते पत्नी प्रियंकासह कारने मूर्तिजापूर तालुक्यातील दुर्गवाडा येथून अमरावती जिल्ह्यातील नांदुरा येथे जाणार होते व नांदुऱ्यावरुन नागपूरकडे जाणार होते. बडनेरा ते अमरावती महामार्गावरील महादेवखोरी पुलाजवळ महादेव सुरजुसे यांच्या कारच्या टायरला दगडाचा मार लागून टायर फुटला आणि त्यांची कार रस्त्याच्या खाली उतरली. यावेळी कारमध्ये बसलेले महादेव व प्रियंका यांना दुखापत झाली नाही.

रस्त्याच्या खाली उतरलेल्या कारमधून त्यांना काही तरुणांनी सुखरूप बाहेर काढले. याचवेळी पाऊस सुरू झाला होता. त्यामुळे महादेव खोरी भागात राहणाऱ्या एका तरुणाने सुरजुसे दाम्पत्याला स्वत:च्या घरी नेले. पाऊस सुरू असल्यामुळे प्रियंका त्या तरुणाच्या घरी थांबल्या आणि महादेव व तो तरुण कार काढण्यासाठी क्रेनच्या शोधात बाहेर गेले. त्यानंतर प्रियंका यांनी त्यांचे भासरे सुभाष सुरजुसे यांना फोन करुन कारचा अपघात झाल्याची माहिती दिली. तसेच नांदुरा येथे राहणाऱ्या त्यांच्या भावालाही सांगितले.

बातम्या आणखी आहेत...