आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीची छेड काढणाऱ्याला‎ हटकले; आईवर केला हल्ला‎:गाडगेनगर पोलिसांत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत‎ राहणाऱ्या एका १४ ते १५ वर्षीय मुलीची‎ एकाने छेड काढली. त्यामुळे मुलीच्या‎ वडिलांनी त्या तरुणाला हटकले.‎ यावेळी त्या तरुणाने त्याच्या मित्रांना‎ घेऊन मुलीचे घर गाठले आणि‎ मुलीच्या आईला गंभीर मारहाण केली,‎ तसेच दुचाकीची तोडफोड केली. या‎ प्रकरणी मुलीच्या नातेवाइकांनी‎ दिलेल्या तक्रारीवरून गाडगेनगर‎ पोलिसांनी शुक्रवारी (दि. ७) सहा‎ जणांविरुद्ध गंभीर गुन्हा नोंदवला.‎ एक चौदा वर्षीय मुलगी रस्त्याने‎ जात असताना एका तरुणाने तीची छेड‎ काढली. ही बाब मुलीने तीच्या‎ वडिलांना सांगितली.

त्यावेळी‎ मुलीच्या वडिलांनी त्या तरुणाला‎ हटकले आणि यानंतर या रस्त्याने‎ जायचे नाही, अशा पध्दतीने समजावून‎ सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो‎ मुलगा त्या ठिकाणाहून निघून गेला.‎ मात्र तासाभरानंतर तो तरुण त्याच्या‎ पाच मित्रांना घेऊन मुलीच्या घरासमोर‎ आला. यावेळी त्यापैकी काही‎ जणांच्या हातात बेसबॉल स्टीक होती.‎ त्यांनी या स्टीकव्दारे मुलीच्या‎ घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकीची‎ तोडफोड केली तसेच मुलीच्या‎ आईला गंभीर मारहाण केली.