आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनयात्रा:हंतोडा येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

अंजनगाव सुर्जी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील हंतोडा येथील विनायक दाभाडे (वय ५२) या शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. विनायक दाभाडे हे सोमवार, ५ डिसेंबरला घरून गेल्यावर रात्री परत आले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरु केला होता. परंतु ते कोठेही आढळून आले नाही. त्यामुळे ६ डिसेंबर रोजी सकाळी शेतीकामाला विनायक दाभाडे मजुरांना विनायकराव हे शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन लटकलेले आढळले.

घटनेची माहिती अंजनगाव पोलिसांना मिळताच मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनास पाठवला. नापिकीमुळे विनायकराव काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी आणि आप्त परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...