आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनावरांना काहीही खायला दिल्यास 25 हजाराचा दंड:मेळघाटातील सूचना फलक शोभेची वस्तू; अद्याप एकालाही केला नाही दंड

अमरावती15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पर्यटन करताना प्राण्यांना काहीही खाण्यास दिले तर 25 हजाराचा दंड केला जाईल, असे सुचना फलक जागोजागी लागले आहेत. परंतु, त्याकडे अजिबात लक्ष न देता पर्यटक वन्य प्राण्यांना खाण्यासाठी विविध खाद्यपदार्थ येथे फेकतात. त्यामुळे वन्य प्राण्यांसह पर्यटक, नागरिकांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे. परंतु, आजवर कोणावरही कारवाई करण्यात आली नसल्यामुळे हे फलक केवळ शोभेचे वस्तू ठरले आहेत.

प्राण्यांना पर्यटक विविध वस्तू खायला देतात. वास्तविकत: ते त्यांचे नैसर्गिक खाद्य नाही. त्यांना बाहेरील खाद्य पदार्थ खाण्याची सवय जडली तर वेळप्रसंगी ते हल्ला करण्यास मागेपुढे बघत नाहीत. एखादवेळी पर्यटक किंवा रस्त्याने जाणाऱ्या आदिवासींजवळ जर त्यांना बॅग दिसली तर ती हे प्राणी हिसकतात. कधी हल्लाही करतात. वाहन चालकांच्या अंगावर हे वन्यजीव उडी घेतात. त्यामुळे त्याचे नियंत्रण सुटते. स्वत:चा बचाव करण्यासाठी नागरिक, पर्यटकही प्राण्यांना हाती असेल ते मारण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे वन्यजीव आणि पर्यटक व नागरिकांना जखमा होतात. असे प्रकार टाळण्यासाठीच हे फलक लावण्यात आले आहेत.

वन्य जीवांना त्यांचे नैसर्गिक खाद्य मिळावे

मेळघाट पर्यटन व्यवस्थापक स्वप्नील बंगाडे म्हणाले की, वन्य जीवांना त्यांचे नैसर्गिक खाद्य मिळावे तसेच पर्यटक व नागरिकांच्या जीवाला कोणताही धोका होऊ नये, हाच यामागील मुख्य उद्देश आहे. एकदा सवय झाली की प्राणी मग खाद्य मिळविण्यासाठी हल्ला करण्यास मागेपुढे बघत नाहीत.

बातम्या आणखी आहेत...