आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • A Fine Of 5 Thousand Will Be Levied As Soon As A Carry Bag Is Found In Hand; Formation Of Teams By Municipal Vigilance Department \ Marathi News

कठोर कारवाई:कॅरीबॅग हाती दिसताच होणार 5 हजारांचा दंड ; मनपा दक्षता विभागाद्वारे पथकांचे गठन

अमरावती22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगल युज प्लास्टिकवर बंदीची अधिसूचना जारी होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अजुनही नागरिकांची कॅरीबॅग वापरण्याची सवय गेली नाही. एवढेच नव्हे तर शहरातील काही प्रतिष्ठानांसह फेरीवाले अजुनही ग्राहकांना कॅरीबॅगमध्ये खरेदी केलेले साहित्य देत आहेत. ते बघता महानगर पालिकेने कठोर पावले उचलली असून स्वच्छता विभागाद्वारे दक्षता पथकांचे (फ्लाईंग स्क्वॉड) गठन करण्यात आले आहे. एखादा दुकानदार किंवा सर्वसामान्य नागरिकांच्या हातात जर कॅरीबॅग दिसली तर त्याला तत्काळ ५ हजार रु. दंड आकारला जाणार आहे. दरम्यान व्यापाऱ्यांनी ग्राहकांना कॅरी बॅगची सवय जडल्याची माहिती दिली आहे.

जुलै ते ऑगस्ट या दोन महिन्यांत मनपा पथकांनी सुमारे ६० हजार रु. दंड वसूल केला आहे. विविध प्रतिष्ठाने, फेरीवाल्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली असून सातत्याने कारवाई सुरू आहे. प्लास्टिक पिशव्यांची सवय नागरिकांमध्ये कमी व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणात मनपाद्वारे जनजागृती केली जात आहे. दंड टाळण्यासाठी प्लास्टीक ऐवजी आता कापडी पिशव्यांचा वापर केला जात आहे. अनेकांनी घरून निघताना कापडी पिशव्या सोबत बाळगणे सुरू केले आहे. अजुनही काहींना कॅरीबॅग ची सवय असल्यामुळे त्यांची ही सवय मोडणे गरजेचे आहे. कारण त्यांनी फेरीवाले, दुकानदारांकडे कॅरीबॅग मागितली की, नाईलाजाने त्यांना ती द्यावी लागते. विशेषत: भाजी व फळांसाठी कॅरीबॅग मागण्याची पद्धत व सवयच रुळली आहे. ती कमी करण्यासाठी मनपाला विशेष जनजागृती करण्यासोबतच फळ आणि भाजी विक्रेत्यांवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत करावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...