आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील हिंगणी मिर्झापूर येथील शेतकरी भरत नवलकर यांनी आपल्या १० एकर कोरडवाहू शेतामध्ये लाखो रुपये खर्च करून तुरीची लागवड केलेली होती. गत दोन-तीन दिवसांपूर्वी तुरीची सोंगणी करून तुरीची गंजी लावलेली होती. मात्र रविवारी दुपारी शेतातील तुरीच्या गंजीला कोणीतरी आग लावली यात तुरीची गंजी जळून राख झाली. या आगीत शेतकरी भरत नवलकर यांचे अंदाजे ४ लाख रुपयांच्या जवळपास नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. सदर आग लागल्याची माहिती गावात पसरताच गावातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आगीने रौद्ररूप धारण केले होते. दरम्यान दर्यापूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला बोलावले. परंतु तोपर्यंत आगीमध्ये तुरीची गंजी पूर्णतः जळून खाक झाली होती. नवलकार यांनी दर्यापूर पोलिस स्टेशन येथे या संदर्भात तक्रार दाखल केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.