आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांची सायकल रॅली:अमरावती शहरातील पहिलाच उपक्रम

अमरावती24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर येथे महिलांनी सायकल रॅली काढली.महिलांनी राबवलेला अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे. रॅलीमध्ये 50 हून अधिक महिलांनी सहभाग घेतला. जिल्हा स्टेडियम येथून या रॅलीचा प्रारंभ झाला. दरम्यान आरोग्य राखण्यासाठी हा उपक्रम आवश्यक असून तो नियमितपणे राबवला जावा, असे मत आमदार सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केले. त्यांच्या हस्ते या रॅलीला हिरवी झंडी दाखविण्यात आली.

अमरावती सायकलिंग असोसिएशनच्यावतीने या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरणाचा समतोल यथावत राखण्यासाठी तसेच शारीरिक क्षमता व तंदुरुस्ती वृद्धिंगत होण्यासाठी नियमितपणे सायकलिंग करणे आवश्यक आहे, असे अनेक वैद्यक सांगतात. त्यामुळे आम्ही नियमितपणे असे उपक्रम राबवितो, असे सायकलिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महिला सायकलपटूंना टी-शर्टचे वितरण करण्यात आले.

तत्पूर्वी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी सर्व सायकलपटूसोबत संवाद साधला. जिल्हा स्टेडियम येथून या सायकल रॅलीला सुरुवात झाल्यानंतर हॉटेल गौरी इन-कठोरा-नांदुरा-गाडगेनगर मार्गे सायकलिंग करीत सायकलपटूंनी जवळपास 25 किलोमीटरचा टप्प्या पार केला. पुढे पंचवटी चौक मार्गे ही सायकल रॅली जिल्हा स्टेडियम येथे परतताच समारोप झाला.

याप्रसंगी संजय खोडके, एच व्ही पी एमच्या सचिव डॉ. माधुरी चेंडके, प्रा.डॉ. मोहना कुलकर्णी, अमरावती सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कुलकर्णी, सचिव अतुल कळमकर, कोषाध्यक्ष पियुष क्षीरसागर, डॉ. सुरीता डफळे, वैखरी कळमकर, संजय मेंडसे, लक्ष्मीकांत खंडागळे, प्रवीण जयस्वाल, राजू देशमुख, शशिकांत ठवळी, सागर धनोडकर, स्मीता मोरखडे, ऍड. सुषमा जोशी, अर्चना दुधे, मोनाली ढोले, मीनल देशमुख, राधा राजा,सोनी मोटवानी, कीर्ती बरडीया, कविता धुर्वे, विश्वजा वानखेडे, शालिनी सेवानी, राधा सावदेकर, वैशाली ठाकरे, मिथिलेश राठोरे, नबोनिता कक्कड, रजनी गिरी, संगीता ठाकरे, अर्चना मांगे, कमलेश, अमिता देशपांडे, अंजली देशमुख, अल्का जोशी, शालिनी महाजन, डॉ. जागृती शाह, डॉ. संगीता कडू, रेखा केवलरामानी, डॉ. नीता व्यवहारे, शुभदा दिवाण, साधना मेहता, गीता वंजारी, रेश्मा खत्री, अनिषा खत्री, सोनाली लेंडे, रिया तिडके, हेमा धोपाडे, शुभांगी चव्हाण, मेघा कराळे, श्रद्धा नांदुरकर, अंजली झोड, वर्षा राजुरकर, मोनिका केडीया आदीसहित अमरावती सायकलिंग असोसिएशनचे सर्व सदस्य, पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...