आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पोस्टरसह ध्वजाचे केले दहन

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ शनिवारी राजकमल चौकात भाजपने पाकिस्तानचा ध्वज आणि बिलावल भुट्टो यांचे प्रतिकात्मक पोस्टर जाळून निषेध व्यक्त केला. या वेळी भुट्टो यांच्या विरोधात भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यानी तीव्र निदर्शने केली. तसेच पाकिस्तान सरकारने माफी मागावी, अशी मागणीही भाजपने केली आहे.

संयुक्त राष्ट्राच्या सभेत बोलताना पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात भाजप कार्यकर्त्यांत संतापाची लाट उसळली आहे. अमरावतीत शहर भाजपच्या वतीने राजकमल चौकात पाकिस्तानचा ध्वज जाळून परराष्ट्रमंत्री भुट्टो यांच्या विरोधात निदर्शने केली. संतप्त कार्यकर्त्यांनी परराष्ट्र मंत्री भुट्टो यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडे-चपलांनी बदडले. देशाचे सर्वात यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अशी वक्तव्य खपवून घेणार नाही, असा इशारा या वेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला. तसेच पाकिस्तान सरकारने माफी मागावी, अशी मागणी या वेळी आंदोलकांनी केली.

आंदोलनात माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, शहराध्यक्ष किरण पातूरकर, जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, रवींद्र खांडेकर, तुषार भारतीय, जयंत डेहनकर, राजेश वानखेडे, माजी महापौर चेतन गावंडे, गजानन देशमुख, मंगेश खोंडे, प्रशांत शेगोकर, राजेश पाठक, दिनेश सूर्यवंशी, गंगा खारकर, रिता मोकलकर, सुरेखा लुंगारे, संजय तिरथकर, नितीन गुडघे, चेतन पवार, प्रणित सोनी, विवेक कलोती, सचिन रसाने, सुभाष श्रीखंडे, राजू कुरील, संगीता ठाकरे, श्रद्धा गेहलोद, पंचफुला चव्हाण, पद्मजा कौंडण्य, राजू मेटे, राजेश गोयंका, डॉ. वीरेंद्र ढोबळे, प्रवीण वैश्य, आशिष अतकरे, संगीता तोंडे, लाविना हर्षे, तृप्ती वाठ, रोशनी वाकले, रश्मी नावंदर, अजय आगरकर, अजय सारसकर, प्रकाश ढोपे, राजू तांबेकर, संजय आठवले, धनराज चक्रे, मिलिंद बांबाल, सविता भागवत, आकाश कविटकर, रूपेश दुबे, योगेश निमकर, अंकेश गुजर, मंगेश काळे, रावसाहेब देशमुख, नरेश धामाई, स्वप्नील सातोटे, शिल्पा पाचघरे, प्रकाश सरदार, राजेश गोफाने, चंदन सूर्यवंशी, योगेश वानखेडे, हेमंत श्रीवास आदी सहभागी झाले होते.

या वेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी आपल्या तीव्र शब्दात या वक्तव्याचा निषेध केला. शहर अध्यक्ष किरण पातूरकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान भारत देश सहन करणार नाही. पाकिस्तानला याची मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचे पातूरकर म्हणाले. तसेच माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी पाकिस्तानच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. पाकिस्तानने इतिहास बघून आपली वागणूक सुधारावी, अन्यथा पाकिस्तानला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पोटे यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...