आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या विरोधात अखिल भारतीय तांडा सुधार समितीने माळपठार गहुली ते नागपूर अधिवेशन दरम्यान पायदळ संघर्ष यात्रा सुरू केली असून, मंगळवारी या आंदोलनाची यात्रा बंजारा समाजाची क्रांतीभूमी पोहरागड येथे पोहोचली. तत्पूर्वी, समितीचे महासचिव नामा बंजारा यांनी महानायक वसंतराव नाईक यांच्या स्मृतिस्थळी जाऊन नाईक यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. महानायक वसंतराव नाईक यांनी खेड्या-पाड्यातील मुले शिकली पाहिजे, यासाठी शेकडो आश्रम शाळा सुरू केल्या. शासन आज पटसंख्येच्या नावावर अशा हजारो शाळा बंद करत असून, गरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
शासनाचा हा डाव हाणून पाडण्यासाठी या पायदळ यात्रेत मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन संजय आडे यांनी केले आहे. यशवंतराव चव्हाण, गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाप्रमाणेच वसंतराव नाईक यांच्या स्मृतिस्थळाचे शासकीय निधीतून सौंदर्यीकरण करण्याची मागणी तांडा सुधार समितीने लावून धरली आहे. राजस्थान व कर्नाटक राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याने पदोन्नतीत आरक्षण द्यावे, राज्य मागासवर्गीय आयोगाने दोनदा शिफारस करूनही रद्द न करण्यात आलेली नॉन क्रीमिलेअरची अट रद्द करावी, संत सेवालाल महाराज यांच्या जयंती दिनी १५ फेब्रुवारीला शासकीय सुटी घोषित करावी, घरकूल कर्ज मर्यादेत वाढ करावी तसेच वसंतराव नाईक महामंडळाच्या निधीत वाढ करावी, नागपूर येथे वसंतराव नाईक यांच्या नावाने भव्य सभागृहाची निर्मिती इत्यादी मागण्या या अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या पायदळ यात्रेत करण्यात आल्या.
२२ डिसेंबरला ही यात्रा नागपूर अधिवेशनावर धडकणार असल्याची माहिती नामा बंजारा यांनी दिली. या पदयात्रेत नामा बंजारा, प्रा. सरदार राठोड, राजू रत्ने, धर्मेंद्र जाधव, संजय मदन आडे तालुकाध्यक्ष पुसद, जिनकर राठोड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अ. भा. बंजारा युवा सेना, शेतकरी नेते मनोहर राठोड, सुनील चव्हाण सरपंच हिवळणी, मानोरा तालुकाध्यक्ष, रामराव राठोड कार्याध्यक्ष, एकराज जाधव, धर्मराज आडे आदींनी सहभाग घेतला आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.