आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण आग:मॉडेल रेल्वे स्थानकाच्या आत लागली भीषण आग

अमरावती7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बोगी थोडक्यात बचावली; तासाभरात आग आटोक्यात

अमरावती मॉडेल रेल्वे स्थानकाच्या परिसरात इर्विन चौक ते कॉटन मार्केटच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यालगत शुक्रवार,दि. ११ रोजी सायंकाळी ६.१५ च्या सुमारास भीषण आग लागली. सायंकाळच्या सुमारास वेगवान वारे वाहत असल्याने ही आग झपाट्याने पसरली. आगीने रौद्र रूप धारण केले. आगीचे लोट प्लॅटफॉर्मच्या दिशेने पुढे सरकत असताना बघून तत्काळ अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन मुख्यालय जवळच असल्यामुळे तत्काळ सात कर्मचारी, अधिकारी व दोन बंब घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तासभरात आगीवर नियंत्रण मिळवले.

रेल्वे स्थानकाच्या डाव्या बाजूला आग लागली. याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळलेली झुडपे असल्याने आग वेगाने पसरली. कोणीतरी जळती काडी किंवा एखादी पेटलेली वस्तू त्या ठिकाणी टाकल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली.

जवळच प्लॅटफॉर्म आहे. तसेच तेथे गाडीच्या बोगीही उभ्या होत्या. जर वेळीच आग नियंत्रणात आली नसती तर ती बोगीपर्यंत पोहोचण्यास वेळ लागला नसता, अशी माहितीही अग्निशमन विभागाकडून देण्यात आली. अगदी रेल्वे स्थानकाच्या भिंतीपासून २० फुट अंतरावर उड्डाण पुल असल्यामुळे पुलावरून आगीवर पाण्याचा मारा केला.

आश्चर्य, हवेमध्ये गारवा असतानाही लागली आग
शहरात सायंकाळी तुरळक पाऊस झाला. त्यावेळी वेगवान वारे वाहत होते. अशातच आग लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. काेणीतरी जळता निघारा, काडू फेकल्यानंतर वारा वाहत असल्यामुळे तेथील वाळलेले गवत व झुडपांना आग लागली व ती वेगाने पसरली. कोणीही जळत्या वस्तू फेकू नये असे आवाहन अग्निशमन विभागाद्वारे करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...