आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंजनगाव बारी परिक्षेत्रातील उतखेड शिवारात एका बिबट्याने गाय फस्त केल्याची घटना शनिवारी सकाळी समोर आली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंजनगाव बारी परिसरात भानखेड, मोगरा तसेच कोंडेश्वरच्या गोविंदपूर परिसरात जंगली प्राण्यांचा वावर नेहमीच आळतो. यामध्ये रोही, बिबट्या, रानडुकरे तसेच अन्य जंगली प्राणी आढळून येतात. उतखेड शिवारात शेतकरी राजू ठाकरे व दीपक ठाकरे हे रात्रीच्या वेळी शेतातील तूर व हरभरा पिकाच्या रखवालदारीसाठी गेले होते.
या वेळी त्यांची गाय शेतात बांधून होती. ते शेतातच मात्र दुसऱ्या बाजूने असतानाच काही वेळाने गाईचा हंबरडा ऐकायला आला. त्यामुळे त्यांनी गाईच्या दिशेने धाव घेतली असता बिबट गाईला फस्त करत असल्याचे दिसले.
बिबट्याला हाकलून लावण्यासाठी त्यांनी आरडाओरडा केला, मात्र बिबट्याने गाईचे लचके तोडले हाेते. या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. त्यामुळे वन विभागाने शनिवारी सकाळी घटनास्थळी पाेहाेचून पंचनामा केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.