आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका विवाहितेसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्या दरम्यानचा व्हिडीओ त्याने चित्रीत केला आणि हाच अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देवून विवाहितेवर वारंवार अत्याचार केला. त्यानंतरही त्या तरुणाने तोच व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करुन व्हायरल केला. या प्रकरणी पीडीत विवाहितेच्या तक्रारीवरून लोणी पोलिसांनी २९ वर्षीय तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. किरण काशीनाथ गजभिये (२९, रा. जळू) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. २०२० मध्ये किरणची एका विवाहित महिलेसोबत ओळख झाली. त्यावेळी ‘तुम्ही मला खूप आवडता’, असे किरणने त्या विवाहितेला म्हटले. या महिलेचा पती जास्त दारु पिण्याच्या सवयीचा असल्यामुळे महिलासुद्धा किरणकडे आकर्षित झाली होती.
त्यांच्यात प्रेमसंबंध झाल्यानंतर किरणने महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर अनेकदा तो विवाहित महिलेवर अत्याचार करतच होता. एकदा अत्याचाराच्यावेळीचा महिलेचा व्हिडिओ त्याने मोबाइलमध्ये काढला. दरम्यान ही बाब महिलेला माहीत झाल्यानंतर तिने किरणला तो व्हिडिओ डिलीट करण्याबाबत म्हटले असता, त्याने व्हिडिओ डिलीट केला नाही. उलट हाच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देवून त्याने वारंवार अत्याचार केला. त्यानंतर तोच आक्षेपार्ह व्हिडिओ किरणने इंटरनेटवर अपलोड करुन व्हायरल केला, अशी तक्रार पीडीत महिलेने केली आहे. या तक्रारीवरून लोणी पोलिसांनी किरण गजभिये विरुद्ध बलात्कार करणे, धमकी देणे तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.