आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामूहिक बलात्काराचा पोलिसांत गुन्हा दाखल‎:चाकू दाखवून आणि ब्लॅकमेल करून‎ अल्पवयीन मुलीवर तिघांचा अत्याचार‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवसारी भागातून मैत्रिणीकडे पायी‎ जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर‎ एकाने चाकूचा धाक दाखवून‎ अत्याचार केला. यावेळी दुसऱ्याने‎ त्या मुलीचा आक्षेपार्ह व्हिडिओ‎ काढून त्या आधारे तिला ब्लॅकमेल‎ करुन दोघांनी सामूहिक बलात्कार‎ केला. ही खळबळजनक घटना काही‎ दिवसांपूर्वी घडली आहे. या प्रकरणी‎ पीडितेच्या तक्रारीवरून गाडगेनगर‎ पोलिसांनी सोमवारी (दि. ३)‎ तिघांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा‎ गुन्हा दाखल केला आहे.‎ पीडीत अल्पवयीन मुलगी २५‎ मार्चला दुपारी साडेतीन ते चार‎ वाजेच्या सुमारास नवसारी भागातून‎ मैत्रिणीकडे पायी जात होती.

त्यावेळी‎ एका १८ वर्षीय मुलाने तिला चाकूचा‎ धाक दाखवून बाजूलाच असलेल्या‎ नवोदय विद्यालयाच्या मागील‎ बाजूच्या वनात नेले. त्याठिकाणी‎ त्याने अल्पवयीन मुलीवर‎ जबरदस्तीनेे अत्याचार केला.‎ त्यावेळी अन्य दोन तरुण या वनातच‎ काही दूर अंतरावर होते. त्या‎ दोघापैकी एकाने अल्पवयीन मुलीचा‎ व तिला चाकू लावून नेणाऱ्या मुलाचा‎ आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडिओ तयार‎ केला. व्हिडिओ काढणाऱ्यांनी लगेच‎ त्या मुलीला गाठले व आम्ही तुमच्या‎ दोघांचा व्हिडिओ तयार केला आहे.‎ हा व्हिडिओ मी तुझ्या वडीलांना‎ दाखवणार आहे, जर वडीलांना‎ व्हिडिओ दाखवायचा नसेल तर‎ आम्हाला शरीरसुख दे, अशी मागणी‎ व्हिडिओ काढणाऱ्याने अल्पवयीन‎ मुलीकडे केली.