आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्माष्टमी:वर्तमानकाळातल्या घटनांवर प्रभाव पडून नव इतिहासाची मांडणी होते ; तडस यांचे प्रतिपादन

शेंदुरजना घाट4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इतिहास वर्तमानातल्या घटनांवर प्रभाव पाडून नव इतिहासाची मांडणी करीत असतो किंवा इतिहासाची पुनरावृत्ती तरी होत असते, हे कृष्ण नीतीच्या अभ्यासावरून शोधता येते, असे प्रतिपादन प्रा. संदीप तडस यांनी केले. यावेळी व्यासपीठावर डॉ. सोनपेठकरबाबा, केशव मुनी बिडकर, रमेश बीडकर आदी उपस्थित होते.

वरुड येथील श्री. चिंतेश्वर दत्त मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मानवी संबंधाने आविष्कृत होणारी संस्कृती, समाज जीवनातील बदल आणि त्याने व्यापणारा आपला व्यक्तीगत अवकाश, धर्म आणि आध्यात्मिकतेचे आजचे स्वरूप, आचार विचाराची पडझड श्रीकृष्णाच्या संदर्भाने तपासता येते. एवढेच नव्हे, तर आधुनिक लष्करी युद्धनीती, आजच्या सत्ता संघर्षातील राजकीय भूमिका आणि त्याचे परीणाम, आर्थिक व साम्राज्यवादी दृष्टीकोनातून निर्माण झालेली आधुनिक भांडवलशाही, सांस्कृतिक संबंध, आंतरराज्यीय ताण-तणाव आणि सहसंबंध, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय धोरणे तथा परराष्ट्र नीती आणि त्याचा परस्पर सहसंबंध, जागतिकीकरणाच्या काळातील वैश्विक भूमिकांच्या अंतःप्रेरणा वर श्रीकृष्ण चरित्राचा आणि नीतीचा प्रभाव ठळकपणे दिसून येतो.

यावेळी संत गाडगेबाबा विद्यापीठाचे महानुभाव अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. सोन पेठकर बाबा यांनी महानुभावांचा आचार धर्म तसेच श्रीकृष्ण लीलांच्या माध्यमातून मानवी जीवन विशद केले. यावेळी चिमुकल्यांची दहीहंडीसुद्धा झाली. बाळ कृष्णाच्या वेशभूषा परिधान करून ध्रुवी डहाके या चिमुकलीने यावेळी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कैवल्य काळे, उत्कर्ष घुलक्षे, देवांश देवते, जयंश चौधरी या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला. यावेळी आयोजित महा प्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री. चिंतेश्वर दत्त मंदिराचे अध्यक्ष उज्ज्वल डहाके, सचिव विनय चौधरी, विश्वस्त रमेश बिडकर, संगीता खवले, उज्ज्वल वानखडे, रोशन डहाके, विलास काळे, दिलीप देशमुख, अशोक डहाके, अनिल बेलसरे, अशोक भेले, अजय देशमुख, नरेंद्र पावडे, गणेश सातपुते, उषा वडसकर, योगिता वानखडे, विद्या डहाके, मनोज खसारे, शांता चौधरी, संजय येवले, वसंत शेरेकर यांच्यासह सर्वज्ञ महिला मंडळ तसेच श्री पंचकृष्ण प्रबोधन मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक विनय चौधरी, संचालन उज्ज्वल वानखडे तर आभार प्रदीप बहुरूपी यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...