आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:व्हाॅलीबाॅल कर्णधार देणाऱ्या अभिरुची मंडळाची नवी इनिंग!‎‎

अमरावती‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अडीच दशकांआधी देशाला‎ ज्युनिअर व्हाॅलीबाॅल कर्णधार,‎ आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडू,‎ शिवछत्रपती पुरस्कार विजेते‎ खेळाडू देणारे प्रभात काॅलनी येथील‎ तत्कालिन प्रसिद्ध अभिरुची कला व‎ क्रीडा मंडळ इतिहासजमा झाले.‎ मात्र, माजी खेळाडूंमध्ये‎ व्हाॅलीबाॅलबद्दल असलेला‎ जिव्हाळा त्यांना स्वस्थ बसू देत‎ नव्हता. या सर्व खेळाडूंनी पुन्हा‎ एकत्र येत तत्कालिन व्हाॅलीबाॅल‎ चळवळीला नवसंजीवनी‎ देण्यासाठी प्रभात कला व क्रीडा‎ मंडळाची स्थापना करून शहर,‎ राज्य व देशासाठी उदयोन्मुख‎ व्हाॅलीबाॅलपटू घडवण्याचा विडा‎ उचलला आहे.

येत्या काही दिवसांत‎ होणाऱ्या व्हाॅलीबाॅल स्पर्धेद्वारे या‎ अभियानाला सुरुवात होणार आहे.‎ आम्ही मातीशी जुळले असल्यामुळे‎ आम्हाला नवे खेळाडू घडवायचे‎ आहेत, आम्हाला कुठेही‎ प्रकाशझोतात यायचे नाही. तर‎ शिलांगण रोडवरील संत श्री गजानन‎ महाराज मंदिराला लागून असलेल्या‎ प्रभात काॅलनी येथील या मैदानावर‎ उत्तम खेळाडू घडवल्याचे समाधान‎ मिळावायचे असल्याची प्रामाणिक‎ भावना माजी खेळाडूंनी व्यक्त केली.‎ याच अनुषंगाने पहिला प्रयत्न‎ म्हणून येत्या १४ व १५ जानेवारी रोजी‎ विदर्भस्तरीय खुल्या व्हाॅलीबाॅल‎ सामन्यांचे आयोजन येथे करण्यात‎ आले आहे.

या स्पर्धेनंतर येथे नवे‎ खेळाडू घडविण्याच्या कार्यशाळेला ‎सुरुवात होईल. अशा लहानसहान प्रयत्नांतूनच खेळाला पोषक ‎ वातावरणाची निर्मिती होत असते.‎ देशात आता कुठे खेळांबंद्दल ‎सकारात्मक दृष्टीकोन दिसून येत‎ असून, अशा लहान प्रयत्नांनीच‎ त्याला बळ मिळते, अशी या माजी खेळाडूंची धारणा आहे.‎ मंडळात घडले १५० नामांकित ‎खेळाडू : क्लबमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, अखिल भारतीय, ‎विद्यापीठ, ज्युनिअर, सिनिअर‎ तसेच राज्यस्तरावर खेळणारे पुरुष‎ व महिला गटात १५० नामांकित‎ खेळाडू घडले आहेत. या खेळांच्या‎ आधारे त्यांची कारकीर्द घडली‎‎ आहे. या खेळाडूंमुळे अमरावतीला‎ अडीच दशकांआधी व्हाॅलीबाॅलचा‎ गढ समजले जायचे.
तरुण पिढीला‎ मैदानावर आणायचे आहे‎
आजची तरुण पिढी ही‎ शारीरिक स्वास्थ्याकडे‎ फारसे लक्ष देत नाही.‎ मोबाइल, टीव्हीच्या‎ कचाट्यातून त्यांना मुक्त‎ करून मैदानावर आणायचे‎ आहे. सद्य:स्थितीत‎ अभ्यासाचेही दडपण असते‎ तरी शारीरिक विकासासाठी‎ त्यांनी काही वेळ मैदानावर‎ यावे, यासाठीच हा खटाटोप‎ असल्याचे मत माजी‎ खेळाडूंनी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...