आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोसळला:सराफातील खरैय्या मार्केटच्या इमारतीचा एक भाग कोसळला

अमरावती17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सराफा बाजारातील खरैय्या मार्केटच्या शिकस्त इमारतीचा एक भाग रविवारी सकाळी अचानक कोसळल्याने महापालिकेने तत्काळ ही इमारत सील करून दुकानदारांना ती रिक्त करण्याच्या नोटीस बजावली. तसेच इमारत धोकादायक असल्याने त्यात कोणीही प्रवेश करू नये, असे फलक दर्शनी भागात लावले आहे. या इमारतीमुळे शेजारच्या इमारतींना धोका होऊ नये म्हणून सोमवार, २१ नाेव्हेंबरपासून ती पाडण्याची कारवाई केली जाणार आहे.

ही इमारत ७० वर्षांपेक्षा जुनी असल्यामुळे ती पाडण्याची नोटीस इमारत मालकाला मनपाद्वारे आधीच बजावली आहे. ३० आॅक्टोबरला प्रभात चौकातील राजेंद्र लाॅजच्या तळमजल्यावरील राजदीप एम्पोरियम व बॅग हाऊस या दोन दुकानांच्या छताची दुरुस्ती सुरू असताना दुकाने कोसळून झालेल्या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू, तर दोघे जखमी झाले होते.

या घटनेनंतर मनपाने अॅक्शन मोडवर येत तत्काळ शहरातील अतिधोकादायक ३२ इमारतींवर कारवाई करण्यास सुरुवात केली. याअंतर्गत काही सी-१ अर्थात अति धोकादायक इमारतींना मनपाने जमीनदोस्त केले आहे. शहरातील ७० वर्षांपेक्षा जुन्या तसेच शिकस्त इमारतींचे सर्वेक्षण करण्यासाठी ३ पथकांचे गठन केले आहे. हे पथक इमारती नेमक्या कोणत्या गटात मोडतात, त्यांची स्थिती सध्या कशी आहे, याचा अहवाल तयार करून त्यानुसार कारवाई करणार आहे.

मनपाने नुकतीच बजावली जाहीर नोटीस
महापालिकेने शिकस्त इमारतींसह ज्या इमारतींना ७० वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा इमारतींच्या मालकांसह जर त्यात भाडेकरू राहात असतील त्यांना नोटीस बजावली अाहे. त्यांनी तत्काळ इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून ते मनपाला सादर करण्याची त्यात ताकीद देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...