आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेस्टॉरंट:अमरावतीच्या मॉडेल रेल्वे स्थानकावर लवकरच रेल कोच रेस्टॉरंट होणार सुरू

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती रेल्वेस्थानकावर रेल कोच रेस्टॉरंट लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू होणार असून यासंदर्भातील निविदा प्रक्रियेला मध्य रेल्वेकडून सुरुवात झाली आहे. पाच वर्षांसाठी रेल्वेचा हा करार असणार आहे. तसेच प्रवाशांना शुद्ध नाश्ता मिळावा यावर भर दिला जाणार आहे.

रेल कोच रेस्टॉरंट तयार करण्यासंबंधी रेल्वे मंत्रालयाचे नियोजन होते. याची माहिती मिळताच खासदार नवनीत रवी राणा यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेत त्यांना अमरावती माॅडेल रेल्वे स्थानकाबाबत माहिती देऊन पाच वर्षाच्या कालावधीसाठी निविदेतील अटी व शर्तीनुसार रेस्टॉरंट सुरू करण्याची मागणी केली होती. खा.राणा यांची मागणी रेल मंत्रालयाने मंजूर करून देशातील रेल्वेस्थानकावर रेस्टॉरंट सुरू करण्याच्या यादीमध्ये अमरावती माॅडेल रेल्वे स्थानकाचा समावेश केला. आता लवकरच रेस्टॉरंट सुरू होणार असून, या संबंधाने हालचाली सुरू झाल्या आहेत.

रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खासदार राणा यांना मिळालेल्या माहितीनुसार ३० ऑगस्ट रोजी रेल्वे प्रशासनाकडून फर्स्ट क्लास एअरकंडिशनर रेल्वे कोच रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याला रेस्टॉरेंटप्रमाणे तयार करण्याची प्रक्रिया खासगी कंपनीतून सुरू आहे. लवकरच रेल्वे प्रवाशांना रेल्वेच्या खाद्य दर नियमावलीनुसार खाद्यपदार्थ उपलब्ध होतील.

माॅडेल स्थानकावरच मिळणार प्रवाशांना खाद्य पदार्थ
माॅडेल रेल्वे स्थानकाच्या आत कोणतेही रेस्टॉरंट नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांत प्रवाशांना स्थानकावर खाद्य पदार्थच मिळायचे नाही. खायला काही हवे असल्यास स्वत:सोबत ते घ्यावे लागायचे. किंवा स्थानकापासून ५० ते ७० फुटाच्या अंतरावर असलेल्या रेस्टाॅरंटमधून खरेदी करावे लागायचे. अगदी चहाही मिळायचा नाही. त्यामुळे घाईत असलेल्या प्रवाशांची गैरसोय व्हायची. मात्र, रेल्वे कोच रेस्टाॅरंटमुळे प्रवाशांना स्थानकाच्या आतच आता खाद्यपदार्थ, चहा, काॅफी मिळेल.

बातम्या आणखी आहेत...