आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रमी काम:62 तासांत विक्रमी चाळीस किलोमीटर डांबरीकरण पूर्ण; लोणी ते मूर्तिजापूर मार्गावर दोन्ही लेनचे काम

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती ते अकोला महामार्गावरील लोणी ते मूर्तिजापूरदरम्यान बिट्युमिनिअस काँक्रिटचे (रस्त्यावरील डांबराचा शेवटचा थर) विक्रमी काम ३ जूनपासून सुरू झाले आहे. रविवारी (दि. ५) रात्री १० वाजेपर्यंत म्हणजेच ६२ तासांत या मार्गावरील २० किमतीचे (दोन्ही लेन मिळून ४० किलोमीटर) काम पूर्ण झाले असून, हे काम अखंडपणे ७ जूनला सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुढाकाराने व कंत्राटदार कंपनीने हे विक्रमी काम हातात घेतले असून या कामासाठी मागील ६२ तासांपासून तब्बल ७२८ कामगार तीन पाळींमध्ये काम करत आहेत. विशेष म्हणजेच कामगारांच्या जेवणाचीसुद्धा व्यवस्था कामाच्या ठिकाणीच केली आहे. त्यासाठी डबे पाठवण्यात येत आहे. सध्या उष्णतेची लाट असून, मागील तीन दिवसांपासून ४३ ते ४४ अंश तापमान आहे. या तप्त उन्हात डांबरीकरणाचे काम म्हणजे प्रचंड कठीण आहे, असे असतानाही हे सर्व कामगार अखंडितपणे या विक्रमी कामाला गवसणी घालण्यासाठी कार्यरत आहेत. आतापर्यंत डांबरीकरणासाठी सुमारे २० हजार टन मटेरिअल वापरण्यात आलेले आहेत. या महामार्गावर बिट्युमिनिअस काँक्रिटीकरण (डांबरीकरणाचे) काम येत्या ७ जूनपर्यंत सुरू राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...