आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन दिवसांपूर्वी शहरातील लालखडी भागातील एका पडक्या घरात भंगार खरेदी-विक्रीचे काम करणाऱ्या रमजान खान रहेमान खान (५४, रा. इरफानगर) यांचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेच्या अनुषंगाने नागपुरी गेट पोलिसांनी चौकशी केली असता, रमजान खानची हत्या अनैतिक संबंधाच्या संशयातून झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे नागपुरी गेट पोलिसांनी दोघांविरुद्ध शनिवारी (दि. ४) रात्री गुन्हा दाखल केला. रमजान खान यांचा २ मार्चला मृतदेह सापडला होता. मृताच्या डोक्यावर मार लागून रक्त निघत असल्याचे आढळून आले.
त्यामुळे रमजान यांचा मृत्यू संशयास्पद असल्यामुळे हा घातपाताचा प्रकार असू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद केली. या घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी चौकशी केल्यानंतर रमजान यांचा मुलगा मोहीन खान रमजान खान (२४, रा. इरफाननगर, लालखडी) यांनी तक्रार दिली. त्यामध्ये त्याने सांगितले की, रमजान हे भंगार खरेदी-विक्रीचे काम करत होते. तसेच त्यांच्या एका मित्रासोबत मजुरीचेही काम करत असल्याने ते नेहमीच त्याच्या घरी येत-जात होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.