आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:दर्यापूर-मूर्तिजापूर रोडवर दुचाकी अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू

दर्यापूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साक्षगंधाला जातो असे सांगून घरून निघालेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा दुचाकीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना रविवार, २० नोव्हेंबरला रात्री घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

गौरव देवनाथ वैलकर (२२, रा. नांदेड बु.) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. घटनेच्या दिवशी गौरव मित्राच्या दुचाकीने नांदेड बु. वरून दर्यापूरला मित्राच्या साक्षगंधासाठी मित्रांबरोबर आला. रविवारी सायंकाळी मूर्तिजापूर मार्गाने जात असताना गिट्टीवरून दुचाकी घसरून तो खाली कोसळला. त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता.

दरम्यान काही नागरिकांनी त्याला तत्काळ उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे उपचाराकरिता आणले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे सोमवारी शवविच्छेदन करण्यात आले. मृतक गौरव हा दारापूर येथे अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. २२ वर्षीय होतकरू विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे नांदेड गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...