आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलले गोड हास्य‎

अकोला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मलकापूर येथील गायत्री बालिकाश्रम‎ येथे २६ जानेवारी रोजी‎ हळदी-कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात‎ पार पडला. कार्यक्रमामध्ये अकोला‎ शहरातील महिला, मलकापूर येथील‎ ५०० वर महिलांनी सहभागी होवून‎ कार्यक्रमाची शोभा वाढवली.‎ कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे‎ बालिकाश्रम येथील मुलींच्या हस्ते‎ तीळगुळ, वाण वाटप करण्यात‎ आले. यावेळी बालिकाश्रमातील व‎ उत्कर्ष शिशुगृहातील चिमुकल्यांच्या‎ चेहऱ्यावर गोड हास्य फुलले होते.‎ सहभागी झालेल्या महिलांकरीता‎ उखाणे स्पर्धा, संगीत खुर्ची,‎ दोरीवरच्या उडया, लिंबू चमचा आदी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ स्पर्धा घेण्यात आल्या.

सर्व स्पर्धामध्ये‎ महिलांनी उत्साहाने सहभागी घेऊन‎ पारितोषिके प्राप्त केले. कार्यक्रमाच्या‎ वेळी बालिकाश्रम मधील मुलींनी‎ वाणाच्या वस्तू बोर, हरभरा, उस गहु‎ आदी साहित्यांची रांगोळी काढली.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मुलींनी काढलेल्या रांगोळया‎ कार्यक्रमाचे केंद्रबिंदू ठरले.‎ बालिकाश्रमातील मुलींनी एकल‎ नृत्य, सामुहिक नृत्य, प्रा. श्रद्धा‎ देशपांडे यांनी सासु-सुनेची हास्य‎ नाटिका सादर केली. या वेळी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मुलींनी हातांनी तयार केलेल्या‎ क्राफ्टच्या वस्तूंचे प्रदर्शन लावले.‎ मुलींना आर्थिक व्यवहाराचे थडे‎ मिळवण्यासाठी आनंद मेळा‎ लावण्यात आला. बनवलेल्या‎ पदार्थांचा आस्वाद महिलांनी घेतला.‎

हळदी- कुंक निमित्त बालिकांनी‎ तयार केलेल्या पर्यावरण पूरक‎ वस्तूंचे वाण भेट म्हणून महिलांना‎ देण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी‎ मुलींनी व आलेल्या महिलांनी‎ गाण्यावर नृत्य करून कार्यक्रमाचा‎ आस्वाद घेतला. हळदी-‎ कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन‎ गायत्री बालिकाश्रम उपाध्यक्षा.‎ अश्विनी सुजदेकर, संचालिका‎ मीरा जोशी, अधिक्षिका वैशाली‎ भारसाकळे, समुपेशिका भाग्यश्री‎ घाटे, शिक्षिका विजेयता रायपुरे,‎ उत्कर्ष शिशुगृह अधिक्षिका प्रिति‎ दांदळे, प्रियंका ताले, अर्चना‎ धामाळे, योगिता कोंडावार‎ आदींसह बालिकाश्रमातील मुलींनी‎ परिश्रम घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...