आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलवार:जुगार अड्ड्यावरून 2 लाखांच्या ऐवजासह तलवार केली जप्त

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांदूर बाजार शहरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रविवारी रात्री अड्ड्यावर धाड टाकून ३३ हजारांच्या रोखसह २ लाख ५ हजारांचा ऐवज व एक तलवार जप्त करत आठ जुगाऱ्यांविरुद्ध कारवाई केली.

टिकू ऊर्फ आनंद उबनलाल अहिर (३४), आनंद संतराम अहिर (कालीवाले) (३४), मो. शरीक मो. इक्बाल (३४), अतुल सुधाकर खांडेकर (३२), नितेश सुरेशराव वानखेडे (३१), नावेद खान सलीम खान (२३), सुखदेव यशवंत आमटे (३२, सर्व रा. चांदूरबाजार) आणि साजन रमेश मोहोळ (२८, रा. शिरजगाव बंड) या जुगाऱ्यांविरुद्ध कारवाई केली आहे. यामध्ये टिकू अहिर जुगार अड्डा चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच अड्ड्यावर तलवारही पोलिसांना मिळून आली. त्यामुळे त्याच्याविरुद्ध जुगारासोबतच अवैध शस्त्र बाळगणे या कलमान्वये कारवाई करण्यात आली.

चांदूर बाजार शहरातील मुख्य वस्तीत अहिरचा जुगार अड्डा मागील काही दिवसांपासून सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाला मिळाली होती. त्यामुळे एलसीबीचे पीआय तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात एपीआय रामेश्वर धोंडगे, पीएसआय मुलचंद भांबुरकर, एएसआय दीपक उईके, युवराज मानमोठे, मंगेश लकडे, स्वप्निल तंवर, हर्षद घुसे या पथकाने रविवारी रात्री धाड टाकली. त्यावेळी आठ जुगाऱ्यांसह ३३ हजार रोख, आठ मोबाइल तसेच जुगार खेळण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य असा सुमारे २ लाख ५ हजार ६८५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ताब्यात घेतलेले जुगारी व जप्त केलेला ऐवज पुढील कारवाईसाठी चांदूर बाजार पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.

बातम्या आणखी आहेत...