आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायलेन्स झोन:एकूण 581 सायलेन्स झोन; 2018 मध्ये होते 478, चार वर्षांत वाढले 103 झोन

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात एकूण ५८१ सायलेन्स झोन (शांतता क्षेत्र )असून त्यापैकी १०३ तर गेल्या चार वर्षांत अर्थात २०१८ नंतर वाढले आहेत. तत्पूर्वी ४७८ सायलेन्स झोन होते. शहरातील सुमारे ९ लाख लोकसंख्येचा विचार करता १५४० नागरिकांमागे एक सायलेन्स झोन अशी या ही आकडेवारी येते.

शहरात एवढ्या मोठ्या संख्येत सायलेन्स झोन असले तरी त्याचे पालन हे अभावानेच होताना दिसते. अन्यथा सायलेन्स झोनबाबत तर सर्वत्र उदासीनता आहे. पोलिसांसह मनपा व एकूणच यंत्रणेचे याकडे फारसे लक्ष नाही. महानगर पालिका शासनाला नव्या सायलेन्स झोनची माहिती देत त्या ठिकाणी सायलेन्स झोनचे साईन बोर्ड लावते.

परंतु, सायलेन्स झोनमधून मिरवणूक, लग्नची वरात नेण्यासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असते. तसेच आवाज किती डेसीबल असावा यावरही पोलिसांचीच देखरेख असते. जर त्याचे उल्लंघन होत असेल तर कारवाईचा अधिकारही पोलिसांचा आहे. शहरात अनेक ठिकाणी सायलेन्स झोन असून तेथे साईन बोर्डही लावण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...