आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:उभ्या ट्रकला दुचाकीची धडक; चालकाचा घटनास्थळीच मृत्यू

मारेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खैरगाव येथून मार्डीकडे परत येत असताना रोड लगत उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची जबर धडक बसली. या अपघातात शनिवार, ३ सप्टेंबरला रात्री १० वाजताच्या सुमारास घडली असून संजय पांडुरंग धारणे वय ४८ वर्ष असे मृताचे नाव आहे.

किन्हाळा येथील संजय धारणे रहिवाशी होते. ते बांधकाम ठेकेदार म्हणून काम करायचे. नेहमीप्रमाणे ते काम आटपून खैरगाव येथे मजुरांना मजुरी देण्यासाठी दुचाकीने गेले होते. परतताना रात्री १० वा. च्या सुमारास संजय यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व उभ्या ट्रकला धडक दिली. यात डोक्याला दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अपघाताची माहिती कळताच मारेगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी घटनेचा पंचनामा केला. संजय यांना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. मृताच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, दोन मुली व आप्त परिवार आहे. संजय यांच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...