आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धडक:कारच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नीचा जागीच मृत्यू ; अकोट-अमरावती मार्गावर खोलापूरजवळ अपघात

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अकोटकडून अमरावतीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला विरुद्ध दिशेने जाणाऱ्या कारने जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी (दि. १) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास झाला आहे. ज्ञानेश्वर रामेश्वर वानखडे (५० बांबर्डा, अकोट) व त्यांच्या पत्नीचा या अपघातात मृत्यू झाला. ज्ञानेश्वर वानखडे हे आकोटहून अमरावतीला त्यांच्या नातेवाइकांकडे दुचाकीने येत होते. दरम्यान, खोलापूरपासून दोन किलोमीटर समोर आल्यानंतर कारने (क्रमांक एम. एच. २७ एच ७३५९) त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.

या धडकेत दोघांनाही गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने अमरावतीला रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या अपघाताची माहिती खोलापूर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच ठाणेदार संघरक्षक भगत यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी धडक देणाऱ्या कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पसार कारचालकाचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

बातम्या आणखी आहेत...